वेखंड हे झाड लहान असते. सुगंधी असते आणि खुप फांद्याचे असते. याचे खोड जमिनीत पसरते. याला हिरवट रंगाची लहान लहान फुले येतात. याला येणारी फळे पिवळसर रंगाची असतात. हे झाड भारतात समुद्रसपाटीपासून 280 मीटर उंचीच्या ठिकाणी सापडते. दलदलीची ओलसर जागा या झाडाला मानवते. हिमालयाच्या आग्नेय भागात व कर्नाटकात हे झाड सापडते. ह्या झाडाचे वाळलेले खोड (मूलस्तंभ) हे वेखंडाचे तेल पोट फुगणे , गॅसेस ह्यावर उपयुक्त आहे. वेखंडामुळे पचनशक्ती वाढते. वेखंडाचा उपयोग औषध म्हणून दम्यावर पण करतात. वेखंडात टॅनिन हे औषधी द्रव्य असते. याची पाने सुगंधी पदार्थात , पेयात घालतात. वेखंड आपल्याला परकीय चलन मिळवून देते. ह्याचे कुल आरेसीई- हिंदीत याला बचं असे म्हणतात. तेलगूत वसा असे म्हणतात तर संस्कृतमध्ये भूतनाशिनी असे म्हणतात. वेखंडाची पावडर सर्दीवर वापरतात. अगदी छोट्या बाळाला सर्दी झाली तर वेखंड उगाळून डोक्यावर लेप देतात. सर्दी पटकन कमी होते. प्राचीन काळापासून घराघरात या वनस्पतीला अत्यंत मोलाचे स्थान आहे . म्हणूनच वेखंडाची लागवड करणे खूपच फायदेशीर ठरते. शेतकर्यांनी वेखंडाची लागवड नव्य...
v तुळस तुळशीचे वैज्ञानिक नाव ओसिमम सक्टम ( ocimum sactum) असे आहे. संस्कृत मध्ये हीला वृंदा , सुगंधा , अमृता इ. नावे असून , इंग्रजीत होली बेझील ( Holy basil ) तर हिंदीत तुलसी असे म्हणतात. तुळशीच्या अनेक जाती असून , त्यात 1) श्वेत तुळस व 2) कृष्ण तुळस प्रमुख आहेत. तुळस ही झुडुपवजा वनस्पती असून , ती 2/4 फूट उंच वाढते. हीची पाने छोटी व सुगंधित वास असलेली असतात झाड पूर्ण वाढल्यावर मंजिर्यांमध्ये फुले बहरतात व त्यात गोलाकार , गुळगुळीत काळ्या रंगाची बी तयार होते.साधारणत:हिवाळ्यात बी तयार होते. · रासायनिक गुणधर्म: - तुळशीच्या पांनांपासून तेल तयार होते , जे वाळल्यावर स्फटिकासारखे बनते. त्याला तुळशी कापूर म्हणतात . तुळशीच्या पानांचा व बियांचा उपयोग करतात. · उपयोग :- 1) ताप – जीभ पांढरी होऊन , भ...