Skip to main content

तुळस

v     तुळस
   तुळशीचे वैज्ञानिक नाव ओसिमम सक्टम ( ocimum sactum) असे आहे. संस्कृत मध्ये हीला वृंदा, सुगंधा, अमृता इ. नावे असून, इंग्रजीत होली बेझील (Holy basil) तर हिंदीत तुलसी असे म्हणतात. तुळशीच्या अनेक जाती असून, त्यात
1)  श्वेत तुळस व 2) कृष्ण तुळस प्रमुख आहेत.
   तुळस ही झुडुपवजा वनस्पती असून, ती 2/4 फूट उंच वाढते. हीची पाने छोटी व सुगंधित वास असलेली असतात  झाड पूर्ण  वाढल्यावर मंजिर्‍यांमध्ये फुले बहरतात व त्यात गोलाकार, गुळगुळीत काळ्या रंगाची बी तयार होते.साधारणत:हिवाळ्यात बी तयार होते.
·       रासायनिक गुणधर्म:-
   तुळशीच्या पांनांपासून तेल तयार होते, जे वाळल्यावर स्फटिकासारखे बनते. त्याला तुळशी कापूर म्हणतात. तुळशीच्या पानांचा व बियांचा उपयोग करतात.
·       उपयोग :-
1)  ताप –
जीभ पांढरी होऊन, भूक न लागता ताप येतो, यावर तुळशीच्या पानांचा रस 10 ग्रॅम, कडुनिंबाचा रस 5 ग्रॅम व 1 ग्रॅम पिंपळी टाकून घ्यावा,
ताप उतरतो.
2) पोटदुखी –
21 तुळशीची पाने, 2 ग्रॅम सुंठ याचा पाण्यात काढा करावा व त्यात सैंधव मीठ व तुप घालून रोज ताजा सकाळ – संध्याकाळ 14 दिवस पिल्यास आराम पडतो.
3)  सर्दी खोकला –
तुळशीच्या रस 10 ग्रॅम, 2 ग्रॅम ज्येष्ठमधाची पावडर व 10 ग्रॅम साखर, 5-5 ग्रॅम दिवसातून 5 वेळा घ्यावे.
4)  त्वचारोग –
तुळशीची पाने व रस चोळल्याने खरूज, नायटे इ. रोग बरे होतात. तोंडावर
   किंवा हातापायांवर पांढरे चट्टे पडले असता तुळशीची पाने व थोडे मीठ 
  चोळल्याने फरक पडतो.
5) उन्हाळी-
तुळशीचे बी पाण्यात भिजवून त्यात जिरे व खडीसाखर खाल्ल्यास उन्हाळीचा त्रास कमी होतो.
6) कॅन्सर –
अलीकडेच कॅन्सरवर तुळस ही प्रभावशाली ठरू शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
7)  डास –
दलदलीच्या जागी तुळशीची लागवड केली असता डासांची उत्पत्ती होत नाही.
     अशा तर्‍हेचे अनेक गुण तुळशीच्या झाडात असल्याने आपल्या पूर्वजांनी       
     दूरदृष्टीने घरोघरी
      तुळशीची झाडे असावी अशी योजना करून ठेवली आहे. मानवाच्या आरोग्य   व स्वास्थ्यासाठी
      ईश्वराने ही अत्यंत उपयुक्त वनौषधी निर्माण करून मानवाला बहुमोल देणगी दिली आहे.

      आपल्या घरी अंगणात किंवा कुंडीत तुळस अवश्य लावावी.

Comments

Popular posts from this blog

मेहंदी

      मेहंदी     मेहंदीची झुडपे भारतात सगळीकडे दिसतात.  मेहंदीच्या पानांचा उपयोग रंगविण्यासाठी मुख्यत: केला जातो.  शेत व घराच्या कुंपणासाठी पण या सदाहरीत झाडाचा उपयोग होतो  .  स्रियांच्या शृंगारात मेहंदीला प्राचीन काळापासून एक विशिष्ठ स्थान आहे  .  पानांना सुकवून त्याची वस्रगाळ पावडर बाजारात सर्वत्र मिळते.  मेहंदीचे वैज्ञानिक नाव लॉंऊसोनिया एनर्मिस (  Lowsoniya Inermis  ) आहे.  संस्कृतमध्ये मेहंदीला रक्ता  ,  रंजिका  ,  नखरंजनी ,  मद्द्यान्न्तिका इ.  नावे आहेत. इंग्रजीत हीना (  हीना)  तर हिंदीत मेहंदी म्हणतात.  मेहंदी हे एक झुडुपवजा झाड आहे.  याची पाने छोटी व हिरवीगार असतात.  फांद्यांच्या टोकावर पांढरी सुगंधित मंजिर्यामध्ये फुले येतात.  त्यालाच नंतर छोटी-छोटी फळे गुच्छामध्ये येतात.    ·           रासायनिक गुणधर्म:  - मेहंदीच्या पानांमध्ये  tanin  व  wason  नाव...

वेखंड

वेखंड हे झाड लहान असते. सुगंधी असते आणि खुप फांद्याचे असते. याचे खोड जमिनीत पसरते. याला हिरवट रंगाची लहान लहान फुले येतात. याला येणारी फळे पिवळसर रंगाची असतात. हे झाड भारतात समुद्रसपाटीपासून 280 मीटर उंचीच्या ठिकाणी सापडते. दलदलीची ओलसर जागा या झाडाला मानवते. हिमालयाच्या आग्नेय भागात व कर्नाटकात हे झाड सापडते. ह्या झाडाचे वाळलेले खोड (मूलस्तंभ) हे वेखंडाचे तेल पोट फुगणे ,  गॅसेस ह्यावर उपयुक्त आहे. वेखंडामुळे पचनशक्ती वाढते. वेखंडाचा उपयोग औषध म्हणून दम्यावर पण करतात. वेखंडात टॅनिन हे औषधी द्रव्य असते. याची पाने सुगंधी पदार्थात ,  पेयात घालतात. वेखंड आपल्याला परकीय चलन मिळवून देते. ह्याचे कुल आरेसीई- हिंदीत याला बचं असे म्हणतात. तेलगूत वसा असे म्हणतात तर संस्कृतमध्ये भूतनाशिनी असे म्हणतात. वेखंडाची पावडर सर्दीवर वापरतात. अगदी छोट्या बाळाला सर्दी झाली तर वेखंड उगाळून डोक्यावर लेप देतात. सर्दी पटकन कमी होते. प्राचीन काळापासून घराघरात या वनस्पतीला अत्यंत मोलाचे स्थान आहे .  म्हणूनच वेखंडाची लागवड करणे खूपच फायदेशीर ठरते. शेतकर्‍यांनी  वेखंडाची लागवड नव्य...

कडुनिंब

कडुनिंब कडुनिंब शास्रात म्हटले आहे की रात्रीच्या वेळेस वृक्षांच्या खाली झोपणे हानीकारक असते , पण हा समज कडुनिंबाच्या बाबत मात्र लागू पडत नाही.कारण बाकी वृक्ष रात्रीच्या वेळेस कार्बनडाय ऑक्साइड हा गॅस बाहेर टाकतो. पण केवळ कडुनिंब मात्र प्राणमय ,  आरोग्यवर्धक ,  रोगनाशक वायू बाहेर टाकतात. संस्कृतमध्ये  याला अरिष्ठ म्हणजे ज्याने शरीराला हानी होत नाही असे म्हणतात.  ' निम्बाति , सिंचति स्वास्थ्य इति निम्बम  '  असे म्हटले आहे. प्राचीन वैज्ञानिक ग्रंथामध्ये वसंत ऋतुतील कोवळी पाने विशेष करून सेवन करण्यास संगितले आहे. हा अत्यंत उपयुक्त वृक्ष केवळ भारतातच सर्व ठिकाणी आढळतो. म्हणूनच याला कल्पतरू असे म्हणतात. याच्या अलौकिक गुणांमुळे प्राचीन काळापासून या वृक्षास अत्यंत महत्त्वाचे असे स्थान दिले आहे. अनेक रोगांवर व अन्य कारणांसाठी संपूर्ण झाडाचा उपयोग केला जातो. हिंदु वर्षारंभी  ,  गुढीपाडव्याच्या  दिवशी  कडुंनिंबाची कोवळी पाने ,  सैंधव मीठ , फुले ,  जिरे ,  गूळ ,  कैरी एकत्र करून प्रसाद म्हणून खाण्याची प्रथा भारतात...