मेहंदी
मेहंदीची झुडपे भारतात सगळीकडे दिसतात. मेहंदीच्या पानांचा उपयोग रंगविण्यासाठी मुख्यत: केला जातो. शेत व घराच्या कुंपणासाठी पण या सदाहरीत झाडाचा उपयोग होतो . स्रियांच्या शृंगारात मेहंदीला प्राचीन काळापासून एक विशिष्ठ स्थान आहे . पानांना सुकवून त्याची वस्रगाळ पावडर बाजारात सर्वत्र मिळते. मेहंदीचे वैज्ञानिक नाव लॉंऊसोनिया एनर्मिस ( LowsoniyaInermis ) आहे. संस्कृतमध्ये मेहंदीला रक्ता , रंजिका , नखरंजनी, मद्द्यान्न्तिका इ. नावे आहेत.इंग्रजीत हीना ( हीना) तर हिंदीत मेहंदी म्हणतात. मेहंदी हे एक झुडुपवजा झाड आहे. याची पाने छोटी व हिरवीगार असतात. फांद्यांच्या टोकावर पांढरी सुगंधित मंजिर्यामध्ये फुले येतात. त्यालाच नंतर छोटी-छोटी फळे गुच्छामध्ये येतात.
· रासायनिक गुणधर्म: -
मेहंदीच्या पानांमध्ये tanin व wason नावाचे मुख्य रंजक द्रव्य असते. या व्यतिरिक्त galic asid इ. सारखी द्रव्ये पण असतात व बियांपासून तेल पण प्राप्त होते .
· उपयोग: -
1) डोकेदुखी व पित्त -
गरमी किंवा पित्ताने डोके दुखत असल्यास 25 ग्रॅम मेहंदीची पाने 50 ग्रॅम तिळाच्या तेलात उकळून हे तेल डोक्याला लावावे किंवा 10 ग्रॅम मेहंदीची फुले 100 ग्रॅम पाण्यात उकळून ते पाणी पिण्याने लाभ होतो.
2) तोंड आल्यावर -
10 ग्रॅम मेहंदीची पाने , 200 ग्रॅम पाण्यात उकळून त्या पाण्याने गुळण्या कराव्या.
3) केस रंगविण्यासाठी -
मेहंदीची पावडर , लिंबाचा रस , आवळा पूड , चहाचे पाणी हे सर्व रात्रभर लोखंडी भांड्यात भिजवून , सकाळी केसांना लावावे व 2 - 3 तासांनंतर कोमट पाण्याने धुवावे. केस नैसर्गिकरित्या रंगतात सतेज व मुलायम होतात.
4) अत्तरासाठी -
मेहंदीच्या फुलापासून अत्तर तयार होते.याला हीना असे म्हणतात.
5) घश्याला सूज व तोंड आल्यास -
मेहंदीच्या पानांच्या काढयाने गुळण्या कराव्या.
6) आवेवर -
मेहंदीच्या बिया पाण्यात उकळून ते पाणी पिण्यास द्यावे.
7) हात व पाय सजविण्यासाठी -
पूर्वी काही विशिष्ठ समाजात किंवा
प्रांतात उदा. राजस्थान , गुजराथ इ. लग्नसमारंभात किंवा धार्मिक कार्यात स्रियांनी , विशेषत: नववधुनी मेहंदीने हात सजविण्याची रीत होती. पण आजकाल मात्र संपूर्ण भारतभर शुभकार्यात मेहंदी काढण्याची प्रथा फार प्रचलित झाली असून ,
मेहंदीचा कार्यक्रम हा एक वेगळा कार्यक्रम प्रत्येक लग्नकार्यात
अगदी आवर्जून असतो. अत्यंत कलाकुसरीने सुंदर नक्षीदार नक्षीने नववधू व इतरांचे हात व पाय रंगलेले दिसतात.
8) व्यवसाय-
मेहंदी कढण्याला अतिशय महत्व आल्याने आजकाल ही कला व्यवसाय म्हणून प्रसिद्ध आहे. विशेषत: स्रियांसाठी हा एक सोयिस्कर व घरबसल्या करण्याचा उद्योग ठरला आहे.
द्रव्यगुण विज्ञान , सुश्रुत आदि ग्रंथांमध्ये मदयंती , रक्ता म्हणून
मेहंदीचा उल्लेख आढळतो.
Comments
Post a Comment