Skip to main content

शतावरी

शतावरी
शतावारीचा वेल भारतातील डोंगराळ प्रदेशात प्रामुख्याने आढळतो.
शतावारी ही एक झुडुप वजा वेली आहे. ही वनस्पती साधारण 1 ते 4 फूट उंच वाढते. हीची पाने अगदी बारीक असतात. तिच्यावर काटे असतात. शतावरीच्या मुळांचा व पानांचा उपयोग केला जातो. मंजिर्‍यांमध्ये फुले येतात व वाटण्यासारखी कठीण फळे येतात. शतावारीचे कंद पांढरे व लांब असतात. शतावारीचे वैज्ञानिक नाव अ‍ॅस्पारागस रासेमोसस वाईल्ड (Asparagus Racemosus Wild) असे आहे. संस्कृतमध्ये शतावारी, नारायणी,शतमूली इत्यादि नावे आहेत. इंग्रजीत अ‍ॅस्पारागस (Asparagus) तर हिंदीत शतावर म्हणतात.
रासायनिक गुणधर्म-:
शतावरीत मधुर , स्वादु , शीतल, बल व मेधावर्धक पौष्टिक तत्वे असतात.
उपयोग -:
1) उन्हाळीवर – ओल्या शतावरीच्या मुळया ठेचून त्याचा रस 10 ग्रॅम व तितकेच दूध घालून पिण्याने उन्हाळीचा त्रास कमी होतो.
2) शक्तिवर्धक – शरीरातील सात ही धातु पुष्ट होऊन वजन वाढण्यासाठी शतावरीचे चूर्ण रोज दुधातून घ्यावे.
3) शतावरी तेल – सर्व प्रकारच्या सांधेदुखी व वातविकारांवर हे तेल गुणकारी आहे. यालाच नारायण तेल म्हणतात. कारण संस्कृतमध्ये शतावरीचे एक नाव नारायणी पण आहे. वात विकारांत मज्जा व स्नायू यांना या तेलाने शक्ति मिळते हे सिद्ध झालेले आहे. शतावरी कल्प स्रियांप्रमाणे पुरूषांना देखील उपयुक्त आहे. शतावरी कल्प बाजारात उपलब्ध असते.
4) पित्तावर – शतावारीच्या रसात मध मिसळून चाटल्यास पित्त कमी होते.
 ओली व ताजी शतावरी 100 टक्के गुणकारी असते, सुकी शतावरी 50 टक्के तर 6 महीने जुनी 10 टक्के गुणकारी असते. म्हणून ताज्या मुळांचाच शक्यतोवर उपयोग करावा. धन्वंतरी , सुश्रुत , भावप्रकाश , चरकसंहिता इ. प्राचीन ग्रंथांमध्ये शतावरीचा उल्लेख आहे.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                          



Comments

Popular posts from this blog

मेहंदी

      मेहंदी     मेहंदीची झुडपे भारतात सगळीकडे दिसतात.  मेहंदीच्या पानांचा उपयोग रंगविण्यासाठी मुख्यत: केला जातो.  शेत व घराच्या कुंपणासाठी पण या सदाहरीत झाडाचा उपयोग होतो  .  स्रियांच्या शृंगारात मेहंदीला प्राचीन काळापासून एक विशिष्ठ स्थान आहे  .  पानांना सुकवून त्याची वस्रगाळ पावडर बाजारात सर्वत्र मिळते.  मेहंदीचे वैज्ञानिक नाव लॉंऊसोनिया एनर्मिस (  Lowsoniya Inermis  ) आहे.  संस्कृतमध्ये मेहंदीला रक्ता  ,  रंजिका  ,  नखरंजनी ,  मद्द्यान्न्तिका इ.  नावे आहेत. इंग्रजीत हीना (  हीना)  तर हिंदीत मेहंदी म्हणतात.  मेहंदी हे एक झुडुपवजा झाड आहे.  याची पाने छोटी व हिरवीगार असतात.  फांद्यांच्या टोकावर पांढरी सुगंधित मंजिर्यामध्ये फुले येतात.  त्यालाच नंतर छोटी-छोटी फळे गुच्छामध्ये येतात.    ·           रासायनिक गुणधर्म:  - मेहंदीच्या पानांमध्ये  tanin  व  wason  नाव...

वेखंड

वेखंड हे झाड लहान असते. सुगंधी असते आणि खुप फांद्याचे असते. याचे खोड जमिनीत पसरते. याला हिरवट रंगाची लहान लहान फुले येतात. याला येणारी फळे पिवळसर रंगाची असतात. हे झाड भारतात समुद्रसपाटीपासून 280 मीटर उंचीच्या ठिकाणी सापडते. दलदलीची ओलसर जागा या झाडाला मानवते. हिमालयाच्या आग्नेय भागात व कर्नाटकात हे झाड सापडते. ह्या झाडाचे वाळलेले खोड (मूलस्तंभ) हे वेखंडाचे तेल पोट फुगणे ,  गॅसेस ह्यावर उपयुक्त आहे. वेखंडामुळे पचनशक्ती वाढते. वेखंडाचा उपयोग औषध म्हणून दम्यावर पण करतात. वेखंडात टॅनिन हे औषधी द्रव्य असते. याची पाने सुगंधी पदार्थात ,  पेयात घालतात. वेखंड आपल्याला परकीय चलन मिळवून देते. ह्याचे कुल आरेसीई- हिंदीत याला बचं असे म्हणतात. तेलगूत वसा असे म्हणतात तर संस्कृतमध्ये भूतनाशिनी असे म्हणतात. वेखंडाची पावडर सर्दीवर वापरतात. अगदी छोट्या बाळाला सर्दी झाली तर वेखंड उगाळून डोक्यावर लेप देतात. सर्दी पटकन कमी होते. प्राचीन काळापासून घराघरात या वनस्पतीला अत्यंत मोलाचे स्थान आहे .  म्हणूनच वेखंडाची लागवड करणे खूपच फायदेशीर ठरते. शेतकर्‍यांनी  वेखंडाची लागवड नव्य...

कडुनिंब

कडुनिंब कडुनिंब शास्रात म्हटले आहे की रात्रीच्या वेळेस वृक्षांच्या खाली झोपणे हानीकारक असते , पण हा समज कडुनिंबाच्या बाबत मात्र लागू पडत नाही.कारण बाकी वृक्ष रात्रीच्या वेळेस कार्बनडाय ऑक्साइड हा गॅस बाहेर टाकतो. पण केवळ कडुनिंब मात्र प्राणमय ,  आरोग्यवर्धक ,  रोगनाशक वायू बाहेर टाकतात. संस्कृतमध्ये  याला अरिष्ठ म्हणजे ज्याने शरीराला हानी होत नाही असे म्हणतात.  ' निम्बाति , सिंचति स्वास्थ्य इति निम्बम  '  असे म्हटले आहे. प्राचीन वैज्ञानिक ग्रंथामध्ये वसंत ऋतुतील कोवळी पाने विशेष करून सेवन करण्यास संगितले आहे. हा अत्यंत उपयुक्त वृक्ष केवळ भारतातच सर्व ठिकाणी आढळतो. म्हणूनच याला कल्पतरू असे म्हणतात. याच्या अलौकिक गुणांमुळे प्राचीन काळापासून या वृक्षास अत्यंत महत्त्वाचे असे स्थान दिले आहे. अनेक रोगांवर व अन्य कारणांसाठी संपूर्ण झाडाचा उपयोग केला जातो. हिंदु वर्षारंभी  ,  गुढीपाडव्याच्या  दिवशी  कडुंनिंबाची कोवळी पाने ,  सैंधव मीठ , फुले ,  जिरे ,  गूळ ,  कैरी एकत्र करून प्रसाद म्हणून खाण्याची प्रथा भारतात...